The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : सर्च रुग्णालयात गुरुवार १० ऑक्टोबर २०२४ रोजी नागपुर येथील डॉ. धृव बत्रा यांची मेंदूविकार विशेषज्ञ ओपीडी झाली.या ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार, विविध मज्जातंतूचे आजार, पार्किंन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोकेदुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, एपिलेप्सी, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपानामुळे होणारे मेंदूविकार अशी लक्षणे असलेल्या ७७ रुग्णांनी या ओपीडी मध्ये उपचार सुविधा घेतली.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देण्यात आली. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करण्यात आली. एपिलेप्सी आजरांकरिता आलेल्या निवडक गावातील रुग्णांना मोफत प्रयोगशाळा तपासणी व औषधोपचार करण्यात आले. मेंदूविकार विशेषज्ञ ओपिडी दर महिन्याच्या दुसर्या गुरुवारला नियोजित असून या ओपीडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )