The गडविश्व
नागपूर, दि. १५ : आदिवासी समाजाच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आमदार डॉ. देवराव होळी यांना कुठलाही राजकीय वारसा नाही अशा परिस्थितीत नेतृत्वाला कर्तृत्वाची जोड देवून अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे येऊन वैद्यकीय अधिकारी ते आमदार असा खडतर केला.वत्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे आणि त्यांच्या या कर्तृत्वामुळे ते खरे लोकनायक ठरलेले आहे. दैनिक लोकमत समूहातर्फे आमदार डॉ. देवराव होळी लोकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा वासियांच्या प्रेमानेच आपण या पुरस्काराचा मानकरी ठरलो असल्याची प्रतिक्रिया आमदार देवराव होळी यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर दिली.
१४ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुखझ माजी महिला व बालकल्याण मंत्री आ. यशोमती ताई ठाकूर, लोकमत समूहाचे चीफ माजी खासदार विजयबाबु दर्डा यांचे हस्ते देण्यात आला. अतिव्यस्त पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या पुरस्कार सोहळ्याला आमदार डॉ. देवराव होळी यांना सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही त्यामूळे त्यांच्या वतीने विलास दशमुखे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पूर्व विदर्भातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.