आमदार मसराम यांचा मुक्तिपथतर्फे सत्कार

21

– दारूबंदीच्या वचननाम्याची दिली आठवण, कठोर अंमलबजावणीची मागणी
The गडविश्व
ता.प्र/ वडसा, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी व तंबाखूमुक्तीच्या मागणीसाठी सक्रिय असलेल्या मुक्तिपथ संघटनेच्या प्रतिनिधींनी आमदार रामदास मसराम यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. “पुढील पिढी व्यसनाधीन होऊ नये, याची मला चिंता आहे. जिल्ह्यात दारूबंदी मजबूत करण्यासाठी मी कायम तुमच्या सोबत आहे,” असे मत आमदार मसराम यांनी व्यक्त केले. यावेळी मुक्तिपथच्या सदस्यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी दारूबंदीच्या समर्थनासाठी दिलेल्या वचननाम्याची आठवण करून दिली.
अवैध दारू विक्रीविरोधात कडक उपाययोजनांची मागणी
वडसा, कुरखेडा, आरमोरी व कोरची या चार तालुक्यातील १६४ गावांमधील २१०० सह्यांचे अभिनंदन ठराव आमदार मसराम यांना देण्यात आले. महिलांनी गावातील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी सहकार्याची मागणी केली. यावेळी आमदार मसराम यांनी महिलांशी अर्धा तास संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मुक्तिपथच्या प्रतिनिधींनी अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, दारूविक्रीचा गुन्हा अजामीनपात्र व्हावा यासाठी विधानसभेत मांडणी करावी, दारू विक्रेत्यांना मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करावी, पोलिस विभाग अधिक कठोर कारवाई करावा दारू विक्री वाढलेल्या गावांमध्ये विशेष सुधारणा कार्यक्रम राबवावा, आमदार मसराम यांची सकारात्मक भूमिका.
महिला प्रतिनिधींचे म्हणणे ऐकल्यानंतर आमदार मसराम यांनी दारूबंदी मजबूत करण्यासाठी त्वरित पोलिस विभागाची बैठक घेऊन कारवाईचे आदेश देण्याचे आश्वासन दिले “शाळा तंबाखूमुक्त कशा करता येतील, यावर मी संबंधित विभागांशी चर्चा करतो. जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल,” असे आश्वासन देत त्यांनी मुक्तिपथच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here