– मुक्तिपथ व पोलीस विभाग आढावा बैठक संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यातील दारू मुक्तिपथ व पोलिस प्रशासन समन्वयातून हद्दपार करू असे प्रतिपादन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज १२ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मुक्तिपथ अभियान व पोलीस विभागाच्या समन्वयातून होणाऱ्या कामाची आढावा बैठक पार पडली यावेळी केले.
बैठकीला पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, दारूबंदी पथकाचे प्रमुख उल्हास भुसारी तसेच सर्व तालुक्याचे पोलीस निरीक्षक व १२ हि तालुक्याचे मुक्तिपथचे तालुका संघटक बैठकीला उपस्थितीत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षकांची ओळख मुक्तिपथ तालुका संघटका सोबत करणे, प्रत्येक तालुक्यात दारूविक्री बंदी कारवाईची स्थिती काय आहे, नवीन पोलीस निरीक्षक व मुक्तिपथ मिळून आणखी नवीन रणनीती, कृती कशा पद्धतीने करता येईल, गावातील लोकांची कारवाई मध्ये मदत कशी घेतली पाहिजे, मुजोर व मोठे विक्रेते यांचेवर कारवाई करणे इत्यादि विविध उद्देशाने या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील किती गावात सध्या दारू विक्री बंद आहे, पोलिस प्रशासना द्वारे तालुक्यातील काही गावात चांगले कामे केले गेले, यासोबतच इतर गावात बंदीसाठी कुठे सहकार्य आवश्यक आहे याची मांडणी मुक्तिपथ तालुका संघटकाने बैठकीत करण्यात आली. या सर्व माहितीची नोंद घेत त्वरित कारवाई करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश उपस्थित सर्व पोलिस निरीक्षकांना पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले. त्रासदायक, होलसेल व वारंवार कारवाई होऊन दारू विक्री करतात त्यांचे तडीपार साठी कारवाई केली पाहिजे. ज्या गावात दारू पिणारे लोक आहे त्यांचा उपचार मुक्तिपथ द्वारा झाला पाहिजे, लोकांमध्ये दारूची मागणी कमी झाली पाहिजे, असेही पोलिस अधीक्षक यांनी यावेळी संगितले.
या बैठकी नंतर लगेच दुपारच्या सुमारास जिल्हाभरातून आलेले पोलिस पाटील, मुक्तिपथ व वनविभाग यांची समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस पाटलानी व मुक्तिपथ गावसंघटना, तालुका चमू, पोलिस प्रशासन यांनी अधिक समन्वय ठेऊन काम केले पाहिजे जेणे करून आता दारूविक्री बंद गावे आहेत त्यापेक्षा अधिक संख्येत दारूबंद गावे आपल्याला करता येईल याबाबत पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांचे मार्गदर्शनात सर्व पोलिस पाटलांना संबोधित केले. मुक्तिपथ द्वारा सर्व पोलिस पाटलांना आपल्या गावात काय कृती कार्यक्रम करता येईल, भूमिका व जबाबदारी, व्यसनउपचार शिबीर आयोजन इत्यादि बाबत माहितीचे पत्रक यावेळी देऊन जागृती करण्यात आले व सहकार्याचे आवाहन करण्यात आले.
पुढील आढावा बैठक लवकरच घेतली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगतिले. बैठकीचे प्रास्ताविक व सांगता उल्हास भुसारी यांनी केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath