The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ एप्रिल : तालुक्यातील मुरुमगाव वनपरिक्षेत्र कार्यालय पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे व क्षेत्रसाहायक पदमाकर देशपांडे, वनरक्षक बि.के. ढोने यांनी ४ मार्च २०२३ ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पन्नेमारा ग्रामपंचायत अतंर्गत येणाऱ्या होचेटोला येथे धाड टाकून अवैध ७४ सागवान पाट्या व बॉटम जप्त केल्याची कारवाई केली.
सविस्तर वृत्त, धानोरा तालुक्यातील मुरुमगाव वनपरिक्षेञ (पश्चिम ) अंतर्गत येणाऱ्या होचटोला गावात सागवन लाकडाच्या पाट्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची गोपनीय माहीती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी व त्याचे सहयोगी यांनी होचेटोला येथे जाऊन चौकशी केली असता चिन्हू नेवरू हलामी यांच्या राहते घरात अवैध सागवान चे एकूण ७४ पाट्या व बॉटम मिळाले. यावर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे यांनी ह्या अवैध सागवान पाट्या तस्करी करणारे कोण अशी विचारणा केली असता संतराम राधेश्याम संगोडीया (स्वस्त धान्य दुकानदार पन्नेमारा) रा.मूरूमगावं, मनोहर मंगेराम तूलावी रा.होचेटोला, सुभाष मंडल रा.छत्तीसगढ राज्य, चिन्हू नेवरू हलामी रा.होचेटोला या चार इसमाचे नाव पुढे आले.
तर सध्या सबंधित तपास अधिकारी अविनाश भडांगे वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव यांना या प्रकरणाबाबत प्रस्तुत प्रतिनिधी यांनी माहिती विचारली असता सांगितले की, पन्नेमारा व सिंदेसूर जंगलात लाकूड तस्करी होत असल्याची माहित आहे व चिन्हू नेवरू हलामी यांच्या राहते घरात अवैध सागवान लाकूड एकूण ७४ सागवान लाकूड चे पाटया व बॉटम पकडले आहे आणि ते वन विभागाने ताब्यात घेतले. हा लाकूड पन्नेमारा कंपार्टमेंट नं. ६६९ मधील असून तो मोठ्या झाडाचे जंगलातील असल्याचे सांगितले.
होचेटोला येथील मनोहर मंगेराम तूलावी याने सांगीतल की हा सर्व लाकूड माझ्या शेतातला आहे. परंतु हे आतापर्यत सिध्द झाले नाही, त्यामुळे सागवन पाट्या शेतातील होता तर त्यानी वन विभागाकडून परवानगी का घेतली नाही ? सातबारा व खसरा का दाखल केला नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. या परिसरात सुभाष मंडल या व्यक्ती ला खास करुन अवैध रित्या ने सूतार कामा करीता येथे बसविण्यात आले आहे व हा छत्तीसगढ राज्यातील राहणार असून याकडे कोणताही शासकीय परवाना नाही. अवैधरित्याने हा सूतार काम करतोय, त्याच प्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदार संतराम राधेश्याम संगोडीया मुरुमगाव येथे घर बांधकाम सूरू आहे त्यामुळे हे सागवान त्या घरकामात करीता वापरण्यात येत असतील असाही तर्क वितर्क लावण्यात येत असल्याचे कळते.
सध्या वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव यांच्यामार्फत पंचनामा करून संपूर्ण लाकूड ताब्यात घेण्यात आले असून संबंधित व्यक्तीला सातबारा व खसरा सादर करण्याकरीता सवलत देण्यात आल्याचे कळते. तर आता पर्यंत सबंधित लोकांचे बयान का घेतले नाही? अशी जनता विचारीत आहेत.
(The gadvishva) (the gdv) (gadchiroli dhanora murumgao)