– ३० सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली,१ सप्टेंबर : सुपोषित भारत (कुपोषण मुक्त भारत) या मा. पंतप्रधानांच्या संकल्पनेवर आधारित शासनाच्या विविध विभागामध्ये अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे. पोषण अभियानाच्या अंमलबजावणीकरिता समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन अंगणवाडी सेवा लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येतील. सदर उद्दिष्टे साध्य करण्याकरिता सन २०१८ पासून प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून देशपातळीवर साजरा करण्यात येतो. ०१ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबत केंद्रशासनाने सुचविलेल्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आयोजित करावयाचे आहेत.
यामध्ये पोषण माह सप्ताहामध्ये “सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत” ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आलेली आहे. या संकल्पने अंतर्गत १) बाळाच्या जन्मानंतर पहिल्या ६ महिन्यापर्यंत केवळ स्तनपान व तद्नंतर पूरक पोषण आहार, २) स्वस्थ बालक स्पर्धा, ३) पोषणाबरोबर शिक्षण, ४) मिशन लाईफ अंतर्गत पोषण विषयक सुधारणा, ५) मेरी माटी मेरा देश, ६) आदिवासी भागात पोषण विषयक संवेदनशीलता वाढविणे, ७) अॅनिमिया तपासणी, उपाय व जागृती या विषयांवरील कार्यक्रम संपूर्ण सप्ताहात आयोजित करण्याकरीता ग्रामपंचायत आणि स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांचे तसेच संबंधित विविध विभागाच्या समन्वयाने राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम विविध उपक्रमांसह साजरा करण्यात यावा. या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक लोकांचा जनसहभाग घेण्यात यावा. तसेच सर्व जनतेनी उत्स्फुर्तपणे राबवून सहकार्य करावे व केलेल्या कार्यक्रमांची नोंद दररोज पोषण अभियानच्या डॅशबोर्डवर करण्यात यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.