The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर तसेच युवा जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर व राष्ट्रीय ओबीसी सेवा निवृत्त कर्मचारी महासंघ, ओबीसी महासंघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ जिल्हा गडचिरोलीची युवा कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यावेळी युवा पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान नव नियुक्त निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रीय ओबीसी युवती महिला महासंघ जिल्हा अध्यक्षपदी संतोषी सुत्रपवार, युवा जिल्हा उपाध्यक्षपदी मनोज पिपरे, युवा संघटकपदी अभिषेक चौधरी, युवा गडचिरोली तालुकाध्यक्षपदी पारस फुलझेले, चामोर्शी तालुकाध्यक्षपदी दुशांत कुनघाडकर तर प्रमुख सदस्य म्हणून महेंद्र लटारे, आकाश सोनटक्के, अजय सोमनकर, विकेश दुधबळे, अक्षय चलाख, अक्षय भांडेकर, अविनाश सातपुते, आकाश आंबोरकर, सुशील भांडेकर यांची निवड करण्यात आली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #obc )