The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.१४ : तालुक्यातील येरकड येथे १३ जुलै २०२४ रोजी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण जनजागृती फेरी काढून गावकऱ्यांना माहिती देऊन राष्ट्रीय किटकजन्य कार्यक्रम साजरा करण्यात आला.
आरोग्य विभाग ,ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढून जनजागृती करण्यात आली व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच साथीचे आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच गावामध्ये फवारणी करण्याची असल्याने गावकऱ्यांनी सहकार्य करावे अश्या फेरी मधुन शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच वासुदेव उसेंडी, उपसरपंच सहारे, ग्रामविकास अधिकारी जयंत मेश्राम, स्वप्निल शिंपी, कडपवार, राठोड, डांगे, दडमल, अमित शिंपी व गावातील गावकरी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews (