‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या देशभरातील लढ्याला मोठे यश

23

– पत्रकार चंद्राकरचे मारेकरी अटकेत, १० लाख मदत, पत्रकार भवनही होणार
The गडविश्व
दिल्ली, दि. १८ : छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या न्यायासाठी देशभरात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असून चंद्राकर यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, चंद्राकर यांच्या नावाने पत्रकार भवन उभारले जाणार आहे. जगातील शेवटच्या कोपऱ्यातील पत्रकारांनाही न्याय मिळावा यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ नेहमीच पुढाकार घेईल. आगामी काळात पत्रकारांच्या न्यायासाठीचा लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक- अध्यक्ष संदीप काळे यांनी केले आहे.
पत्रकार मुकेश चंद्राकर यांना न्याय मिळावा यासाठी भारतातील विविध राज्यांच्या अध्यक्षांनी आपल्या राज्यांत आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यामध्ये कुलदीप सोनी (दिल्ली), बन्सीलाल पांचाळ (हरियाणा), पर्वतकुमार मिश्रा (ओडिशा), अक्षित महाजन (जम्मू काश्मीर), प्रेम पाठक (उत्तर प्रदेश), आनंदकुमार रजनली (कर्नाटक), शब्बीर आलम (बिहार), जतिंदर पाल (पंजाब), जिग्नेश जोशी (गुजरात), स्वप्ना दत्ता (आसाम), सुमन गांगुली (पश्चिम बंगाल), गणेश रवी (झारखंड), मेनूस मॅक्स खियेया (नागालँड), सुजल प्रधान (सिक्कीम), बी. संदेश (तेलंगणा), पवन देव (राजस्थान), विकास शर्मा (हिमाचल प्रदेश), अनिल म्हस्के (महाराष्ट्र), फहीम अहमद (उत्तराखंड), हरमिंदर पाल (चंदीगड), डेव्हिड लैथप्लॅन्ग (मेघालय), संदीप पी. व्ही. (केरळ), जोतीनड्रो सिंह (मणिपूर), जोवा (मिझोरम), पियुष मिश्रा (मध्य प्रदेश), जावेद अख्तर (छत्तीसगड), विश्वनाथ प्रभू (तामिळनाडू), बिक्रम कर्माकर (त्रिपुरा) यांचा समावेश होता.
अनेक देशांतही पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्यासाठी लढा उभारण्यात आला. त्यामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे झिंबाब्वेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्सित्सी पी. मशिरी, इथिओपियाचे अध्यक्ष त्सेगये वॉन्डवोसेन बेकले, बांगलादेशचे अध्यक्ष फरझाना बिन्ते हुसैन, केनियाचे अध्यक्ष किंगवा कमेंकु, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हसीबुल्लाह सादत, नेपाळचे अध्यक्ष सुषमा गौतम, मोरोक्कोचे अध्यक्ष सामी एल मौदनी, नेदरलँडचे अध्यक्ष अयाज उर रहमान, म्यानमारचे अध्यक्ष मोहम्मद झोनाईद, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष युसेफ हबाश या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांनीही हत्येचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने देशभरात आंदोलन सुरू केल्यामुळे यंत्रणा जागी झाली आणि आरोपींना तातडीने अटक झाली. याशिवाय, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी चंद्राकर यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि चंद्राकर यांच्या नावाने पत्रकार भवन उभारण्याची घोषणा केली. न्यायासाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला यश मिळाले आहे. जगभरातील सर्व पत्रकारांच्या पाठीशी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास संदीप काळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या शिष्टमंडळाने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून देशात पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांवर कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here