– पोलीस विभागाची माहिती
The गडविश्व
गडचिरोली, २६ डिसेंबर : गोपनिय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान अभियान करीता असतांना उपविभाग भामरागड मधील पोमकें धोडराज हद्दीतील नेलगुंडा येथे २५ डिसेंबर रोजी जहाल नक्षलीस अटक केल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने प्राप्त झाली आहे. वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा बडे (४०) रा. नेलगुंडा तह. भामरागड जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलीचे नाव आहे.
वक्ते ऊर्फ प्रदीप वंजा बड्डे हा १९९७ साली नक्षलमध्ये भरती होवुन, सध्या भामरागड दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ०३ पोलीस खुनासहीत ८ खुन, ३ चकमक, १ दरोडा व इतर १ असे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत. अशा अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून नक्षलीस गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ६० नक्षल्यांना अटक, ०८ नक्षल्यांचे आत्मसमर्पण व ०३ नक्षल्यांचा पोलीस-नक्षल चकमकीमध्ये मृत्यु झाला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षल्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC) (The Gadvishva News Note : Gondwana University has changed this ‘examination’ Word) (Telugu actor Chalapathi Rao) ( Ravichandran Ashwin) (Jesus) (The Witcher: Blood Origin) (Tunisia) (naxal arrest gadchiroli)