– कुरखेडा पुराडा परिसरात विविध हिंसक कारवायात समावेश
The गडविश्व
गडचिरोली, २४ ऑगस्ट : तब्बल ३९ गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षल दाम्पत्याला अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे. कुसनन अशोक रेड्डी उर्फ बलदेव आणि कुमारी कोटाई उर्फ रहमती, असे अटक करण्यात आलेल्या नक्षल दाम्पत्याचे नाव असून मध्यप्रदेशातील जबलपूर येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांवर २० लाखांचे बक्षीस होते. सदर कारवाईने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे
अटक करण्यात आलेल्या अशोक रेड्डी याला यापूर्वी २००५ मध्ये गडचिरोली येथील कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरात केलेल्या हिंसक गुन्ह्यात देखील अटक झाली होती अशी माहिती आहे. तर तो सुरुवातीच्या काळात एका कंपनीत कार्यरत होता त्यानंतर तिथे तो कामगार चळवळीशी जुळला व १९८९ ला नक्षल चळवळीशी संपर्क आल्यानंतर ‘पीपल्स वॉर’मध्ये तो सक्रिय झाला. १९९२ मध्ये अम्प्रो बिस्कीट कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हत्येप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती व १९९५ ला जामिनावर सुटल्यानंतर तो दंडकारण्यात गोंदिया येथे पुन्हा सक्रिय झाला त्यानंतर २००१ मध्ये लग्नानंतर त्याने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-पुराडा परिसरात विविध हिंसक कारवाया घडवून आणल्या व २००६ साली त्याची नक्षल्यांच्या महाराष्ट्र समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती अशीहि माहिती आहे. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली मात्र २०१२ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली, काही काळ गावात राहिल्यानंतर २०१४ पासून तो भूमिगत होता. यादरम्यान अशोक दंडकारण्य स्पेशल झोनल समितीत सदस्य म्हणून कार्यरत होता तर त्याची पत्नी रहमती उत्तर बस्तर समितीची सदस्य आहे असेही कळते. त्याच्या अटकेने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, talati recrutment 2023, talathi exam timetable, Prigozhin,TVS X, Cincinnati vs Inter Miami,King of Kotha,AFC Champions League,AP EAMCET Seat Allotment 2023,Alien, News Today,RRB PO Result 2023,The Village, BBC News, Rebel Moon, India Ireland,G20 Summit,AP EAMCET 2023, Earth,CNN,Hardik pandya, #isrochandrayaan3mission , #IndiaOnTheMoon, #चंद्रयान_3, #VikramLander, “दक्षिणी ध्रुव”, “चंदा मामा” , “Vande Mataram” , #NASA , “India “)