– जिल्ह्यात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : जिल्ह्यात नक्षल्यांचे हिंसासत्र सुरूच असून आणखी एका तरुणाची हत्या करून आपण सक्रिय असल्याचा पुरावाच दिला आहे. रामजी आत्राम ( वय २७ वर्ष) रा. कापेवंचा ता. अहेरी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी नक्षल पत्रक आढळले असून त्यात पोलीस खबऱ्या असल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर ला अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कापेवंचा येथील रामजी हा तरुण आपल्या शेतात काम करीत होता दरम्यान संध्याकाळच्या सुमारास काही सशस्त्र नक्षली त्याठिकाणी पोहचून त्याची गोळ्या झाडून हत्या केली. जिल्ह्याच्या दक्षिण भागात महिनाभरात तिघांची हत्या केल्याने दहशतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली आहे.
एकीकडे शासन प्रशासन जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे आश्वासन देतांना दिसते तर दुसरीकडे नक्षली आपले अस्तित्व असल्याचे हिंसक कारवायातून दाखवून देत आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणेवर सुद्धा मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, crime news, aheri, kapevancha, naxl crime)