नक्षल्यांचा पोलीस दलावर हल्ला ; तीन जवान शहीद तर १४ जखमी

4538

– नवीन पोलीस कॅम्पच्या सुरक्षेदरम्यान केला हल्ला
The गडविश्व
सुकमा, दि. ३० : छत्तीसगडमधील सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या टेकलगुडेममध्ये आज मंगळवार ३० जानेवारी रोजी नक्षल्यांनी मोठी घटना घडवली आहे. सीआरपीएफ कोब्रा आणि डीआरजी जवानांच्या संयुक्त पथकावर केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले तर १४ जवान जखमी झाले असून एका जवानाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
टेकलगुडेममध्ये आजच पोलिसांनी नवीन कॅम्प उघडला असल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी पोलिसांनी टेकलगुडेममध्ये नवीन कॅम्प उभारला. दरम्यान या कॅम्प च्या सुरक्षेमध्ये गुंतलेले जवान छावणीच्या स्थापनेनंतर जुनागुडा-अलिगुडा परिसरात गस्तीवर होते. यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. १०० हून अधिक बीजीएल ही सोडले. दरम्यान जवानांनी मोर्चा सांभाळत प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी काही तास चाललेल्या चकमकीत १४ जवान जखमी झाले तर ३ जवान शहीद झाले. जखमी जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रायपूरला पाठवले गेले आहे. सदर घटनेने पुन्हा एकदा नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (the gdv, the gadvishva, cg news, sukma, bastar)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here