नक्षल्यांचा मोठा घातपाताचा डाव उधळला : स्फोटकांसह १० नक्षलींना अटक

2996

– छत्तीसगड- तेलंगणा सीमेवर कारवाई
The गडविश्व
सुकमा, २४ मे : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणातील भद्राडी कोत्तागुडम पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्यांसह १० नक्षलींना अटक केल्याची माहिती पुढे येत आहे. अटक करण्यात आलेल्या १० नक्षल्यांमध्ये ५ नक्षली छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून ट्रॅक्टर कार्डेक्स वायर आणि सुमारे ५०० डिटोनेटर जप्त केले आहेत.
तेलंगणा पोलिसांच्या माहितीनुसार, माओवादी संघटनेचे सदस्य मुलकानापल्ली आणि दुमुगुडेम मंडळातील एका लपून बसलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली असता भद्राडी कोत्तागुडम पोलिसांनी दुमुगुडेम पोलिस आणि सीआरपीएफच्या १४१ व्या बटालियनचे संयुक्त पथक घटनास्थळी रवाना करून जवानांनी परिसरातील गावे आणि लगतच्या जंगलात शोधमोहीम राबवली. त्यानंतर गावाजवळूनच १० संशयितांना पकडण्यात आले असता त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर, एक बोलेरो वाहन आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या वाहनांची झडती घेतली असता एका ट्रॅक्टरमधून कार्डेक्स वायरचे ९० बंडल, ५०० डिटोनेटर आणि अन्य स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान सर्व आरोपींना स्फोटकांसह अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्यापैकी ५ तेलंगणातील आणि ५ छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पामेड येथील रहिवासी असल्याचे आढळून आले.
तेलंगणा पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षल्यांचा मोठा घातपाताचा डाव उधळला गेला असून सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्यानंतर छत्तीसगड पोलीसही सतर्क झाले आहेत.

naxal arest, Naxalites’ big assassination plot foiled: 10 Naxalites arrested with explosives

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here