– प्रवासी वाहन असलेले दोन टाटा मॅजिक जाळले
The गडविश्व
सुकमा, दि.३ : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात नक्षल्यांचे हिंसाचार सुरूच आहे. जिल्ह्यातील कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंटापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोलापल्ली रोडवर
नक्षल्यांनी दोन प्रवासी वाहन पेटवून दिल्याची घटना पुढे येत आहे. या घटनेने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, गुरुवारी सायंकाळी उशिरा टाटा मॅजिकच्या दोन वाहनांना आग लागल्याची ही घटना घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी नक्षल्यांनी निवडणूक बहिष्काराचे आवाहन करणारे पत्रकेही फेकले असल्याचे कळते.कोंडागावच्या केशकालमध्ये बॅनर बांधून निषेध. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छत्तीसगड दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे.
एका दिवसापूर्वी नक्षल्यांनी कांकेर मधील तीन तर बिजापूर मधील एकाची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातून हत्या केली होती. आता पुन्हा वाहने जाळल्याने परिसरात दहशस्त पसरली आहे
नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे प्रवक्ते विकल्प यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे. नरेंद्र मोदी खोटे बोलतात, असे विकल्पने फॉर्मच्या माध्यमातून सांगितले. त्यांची देशाप्रती असलेली वागणूक चांगली नाही. नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोघेही बस्तरला येत आहेत. या दोघांना देशाला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. त्यामुळे माओवादी संघटनेने त्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, cg news updates, naxal, bijapur, sukama, kanker news)