– अभियानावरून परतणाऱ्या जवानांच्या वाहनाला केले लक्ष
The गडविश्व
बिजापूर, दि. ०६ : छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी आणखी डोके वर काढत मोठा भ्याड हल्ला केला केल्याची घटना सोमवार ६ जानेवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास बिजापूरच्या कुठरू पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या आंबेलीच्या जंगलात घडली . या भ्याड हल्य्यात ९ जवान शहीद झाले तर अन्य जवान गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात कुठरू पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या आंबेलीच्या जंगलात नक्षल विरोधी अभियानावरून जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाला नक्षल्यांनी लक्ष्य करीत वाहन स्फोट करून उडविले. या वाहनात जवळपास १५ हून अधिक जवान असल्याची माहिती आहे. स्फोटामध्ये ९ जवान शहीद तर अन्य जवान गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान स्फोटानंतर नक्षल्यांनी गोळीबारही सुरू केला. घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आल्याचे कळते.