– ‘बेटी पढाओ-बेटी बचाओ’चे ढोंग बंद करा असा केला उल्लेख
The गडविश्व
कांकेर, ४ जून : राजधानी दिल्लीत महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला नक्षल्यांनी बॅनरच्या माध्यमातून संदेश देत पाठिंबा दर्शविला आहे.भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला नक्षल्यांनी समर्थन दर्शवित बॅनरवर बेटी पढाओ-बेटी बचाओ’चे ढोंग बंद करा असा उल्लेख करण्यात आला आहे. कांकेर जिल्ह्यात बांदे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटेबेठिया मार्गावर एक बॅनर लावला असून, त्यात महिला कुस्तीपटूंना त्यांच्या संघर्षात साथ द्यावी, असे लिहिले आहे. नक्षल्यांच्या प्रताफपूर एरिया कमिटीच्या नावाने बॅनर बांधला आहे. ब्रिजभूषण सिंगची सदस्यता रद्द करून अटक करा असाही उल्लेख बॅनर मध्ये करण्यात आला आहे.