नक्षल्यांचा जवानांवर गोळीबार : दोन जवान शहीद

3486

– नक्षल्यांनी जवानांच्या दुचाकीही जाळल्या
The गडविश्व
राजनांदगाव, २० फेब्रुवारी : नक्षल्यांनी जवानांवर केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाल्याची घटना छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतालाब ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नक्षल्यांनी जवानांच्या दुचाकीही पेटवून दिल्या व पसार झाल्याची माहिती आहे. कॉन्स्टेबल राजेश प्रतापसिंह आणि कॉन्स्टेबल ललित यादव असे शहीद जवानांचे नाव आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मोबाईल चेक पोस्टवर जवान तैनात होते, दरम्यान अचानकपणे जंगलाच्या बाजूने नक्षली आले व गोळीबार सुरू केला. यादरम्यान जवानांना प्रत्युत्तर देण्याची कोणतीही संधीही मिळाली नाही त्यामुळे दोन जवानांचा घटनास्थळी मृत्यू झाला. शहीद जवान ललित सम्राट सीएएफमध्ये तैनात होते, ते दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी होते. तर राजेश जिल्हा दलात तैनात होते. सदर घटनेनंतर नक्षल्यांनी जवानांच्या दुचाकीही पेटवून दिल्या व पसार झाले. सदर घटनेनंतर छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री बघेल यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे

– मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. शहीदांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना बघेल म्हणाले की, पोलीस कर्मचाऱ्यांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही.

(The Gadvishva) (Rajnandgao CG) ( Naxal Attack) (The Gdv) (Naxalites firing on jawans: Two jawans martyred)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here