नक्षल्यांनी केली भाजप नेत्याची हत्या

3248
File Photo

– परिसरात खळबळ, भीतीचे वातावरण
The गडविश्व
नारायणपूर, दि.४ : छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी भाजप नेत्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रतन दुबे असे हत्या केलेल्या नेत्याचे नाव आहे. ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा पंचायत सदस्य होते. हे प्रकरण झारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
रतन दुबे हे प्रचारासाठी धौडई आणि कौशलनार येथे गेले होते. प्रचारादरम्यान तो लोकांशी बोलत असताना ग्रामीण पोशाखात असलेल्या नक्षल्यांनी त्याच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर ते खाली पडले. त्यानंतरही त्याच्यावर आणखी २-३ वेळा हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वी २० ऑक्टोबरला मोहला मानपूरमध्येही भाजप नेत्याची हत्या करण्यात आली होती. ९ महिन्यांत ७ नेत्यांची हत्या केली आहे. त्यापैकी ३ जण नारायणपूर जिल्ह्यातीलच होते. १० फेब्रुवारी रोजी नारायणपूरचे भाजप उपाध्यक्ष सागर साहू यांची हत्या करण्यात आली होती.

(cg news, the gadvishva, the gdv, naraynpur, naxal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here