The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : लकवा हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील काही अवयव किंवा अर्ध्याभागाच्या हालचाली बंद होतात. त्यामुळे व्यक्तिच्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा येतात. अर्धांगवायू, लकवा, पक्षाघात ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत आणि या आजारावर माँ दंतेश्वरी दवाखान्यात विशेष न्यूरो-फिजिओथेरपी उपचार सुविधा नियमित सुरू आहे.
ज्यांच्या शरीरात किंवा हातापायात कमजोरी वाटते आणि शरीराची हालचाल करण्यास वेदना होतात किंवा हालचाल करण्यास जमत नाही, हातापायाल स्पर्श जाणवत नाही, चालतांना तोल जातो, जळजळ वाटते, शरीराच्या एका बाजूला कमजोरी वाटते, तोंडाची हालचाल होत नाही किंवा बोलतांना त्रास होतो, शब्दउच्चार बरोबर येत नाही या सर्व समस्या असतील तर सर्च दवाखान्यात न्यूरो-फिजिओथेरपी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सर्च येथील तज्ञ फिजिओथेरपीस्ट यांनी केले आहे. या सेवांमध्ये स्नायूंचा ताठपणा कमी करून लवचिकता वाढवणे, चालतांना ज्यांचा तोल जातो त्यांना विशिष्ट प्रकारचे व्यायाम शिकविणे, मशीनद्वारे उपचार करून स्नायूंची ताकत वाढविणे, तसेच रोजच्या कामांमध्ये लागणारी शारिरीक ताकत वाढविणे, स्नायूंचे संतुलन आणि त्यासाठी लागणारे उपचार देणे यावर काम केले जाते. न्यूरो-फिजिओथेरपी सेवेचा लाभ घेण्यासाठी दवाखान्यात तपासणी केली जाते, त्यानंतर तज्ञांच्या मार्फत उपचार दिला जातो. उपचारासाठी दवाखान्यात राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था अल्प दरात उपलब्ध आहे. तरी या न्यूरो-फिजिओथेरपी सेवांचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा आणि आपले दैनंदिन जीवन सुखकर बनवावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )