गडचिरोलीत सूर्योदय अभ्यासीकेचे नवे पाऊल

344

– न.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारवार व पं.स. गट विकास अधिकारी साळवे यांचे हस्ते उदघाटन संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे हे दृष्टीकोण पुढे ठेवत शहरात सुर्योदय अभ्यासिकेने आपले पाऊल टाकले आहे. २ ऑक्टोबर रोजी शहरातील चामोर्शी मार्गावरील रणदिवे कॉम्प्लेक्स मध्ये गडचिरोली न.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारवार व पं.स. गट विकास अधिकारी साळवे यांचे हस्ते उदघाटन संपन्न झाले.
यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. न.प गडचिरोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारवार हे मार्गदर्शन म्हणाले की, अभ्यासाचे नियोजन, वेळेचा सदुपयोग, अभ्यासामध्ये सातत्य, पेपर विश्लेषण आणि विशेष म्हणजे आपले आईवडील आपली प्रेरणास्त्रोत बनले अशा विविध घटकांवर प्रकाश टाकले आणि आणि काही अडचण अथवा समस्या भासली तर माझ्याशी संपर्क साधावे असे सांगितले. तसेच यावेळी गट विकास अधिकारी साळवे यांनी सुद्धा मार्गदर्शन करतांना अभ्यासिकेला पुस्तक वितरण करण्याचे आश्वासन दिले तसेच अभ्यासिका सुरू करून सामाजिक जाण जपली असेही प्रतिपादन केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष सुरेश भांडेकर, अपीआयचे जिल्हासचिव विजय कृपाकर आणि महेंद्र लांजेवार, भांडेकर उपस्थित होते.कार्यक्रमाला आकाश सोनटक्के, पंकज खोबे, विवेक सेलोटे दुशांत कुनघाडकर, पंकज गव्हारे, सुशील भांडेकर, पद्माकर भुरसे, अक्षय भांडेकर, अक्षय जुवारे, भाविक पोरटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन आकाश आंबोरकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.
सूर्योदय अभ्यासिकेचे संचालक राहुल भांडेकर आणि अजय सोमनकर यांनी अभ्यासिका काढून विशेष कार्य केले असून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना सुविधेचा अभाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here