धानोरा महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न

146

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २५ ऑगस्ट : येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री. जी. सी. पाटील मुनघाटे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीयसेवा योजना विभागाच्या अंतर्गत नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या अंतर्गत मतदार जनजागृती करुन नवीन मतदान नोंदणी कार्यक्रम मा.आम्रपाली लोखंडे तहसीलदार धानोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ ऑगस्ट २०२३ ला पार पडले. यावेळी नायब तहसीलदार वलके, वालके या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश बनसोड यांनी केले. प्रास्ताविकेतुन मतदानाचे अधिकार हक्क कर्तव्य व माझे मत माझी जबाबदारी या विषयवार मार्गदर्शन केले. याप्रसंगी संजय वलके आणि देवेंद्र वाळके नायब तहसीलदार तहसील कार्यालय धानोरा यांनी मतदान जनजागृती संबंधी यथोचित मार्गदर्शन केले. भारतीय लोकशाहीमध्ये मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तरुण मतदार यांनी भारताची लोकशाही सुदृढ करण्याकरीता मतदान अधिकारा बाबत जागृत असणे गरजेचे आहे असे वक्तव्य तहसीलदार श्रीमती आम्रपाली लोखंडे यांनी केले. महाविद्यालयाच्या निवडणूक कक्षा कडून व राज्यशास्त्र विभागाच्या द्वारा नवीन मतदारांना मतदानाचे नमुना क्रमांक सहा चे फॉर्म वितरित करण्यात आले .मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी याप्रसंगी ठिकाणी उपस्थित होते. संचालन प्राध्यापिका रा .से. यो .सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रियंका पठाडे यांनी केले, आभार महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत वाळके यांनी मानले,. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here