निमगाव ते बोरी रस्ता मोजतोय अखेरच्या घटका ; प्रशासन घेतोय कुंभकर्णाची झोप

630

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : तालुक्यातील रांगी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे निमगाव ते बोरी रस्ताच वाहून गेल. मागील वर्षी सुद्धा कुंभकर्णाची झोप घेतलेल्या प्रशासनाला जाग आली नाही आणि कायमस्वरूपी उपाययोजना केल्या गेली नसल्याने त्यामुळे या मार्गाने प्रवास करायचा कसा आणि वाहने चालवायचे कसे असा प्रश्न गावकऱ्यांसह शेतकरी, कर्मचारी आणि इतर प्रवाशांना पडलेला आहे.
निमगाव ते बोरी मार्गावर भला मोठा खड्डा पडलेला आहे. मागील वर्षीच सदर ठिकाणी खड्डा पडलेला होता परंतु यंदाच्या पावसाने पुन्हा त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाल्याने आता या मार्गावरून वाहन काढणे मोठे धोकादायक बनलेले असताना याकडे सबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने कुंभकर्णाची झोप घेतलेल्या प्रशासनाला जाग येईल तरी कधी असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत. प्रशासनाच्या वतीने पाईप टाकून रस्ता तात्पुरता का होईना सुरळीत करता आला असता पण सदर रस्त्याच्या खंड्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. ना ग्रामपंचायत, ना बांधकाम विभागाला, ना लोकप्रतिनिधींना त्यामुळे इथून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
निमगाव धानोरा तालुक्यात येत असून गावापासून पाचशे मीटर अंतरावरती गावाला लागूनच तलाव आहे. जंगलातून येणारा पाण्याचा लोंढा तलावात वाहून जात होता. पण जंगलामध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह सदर शेतकऱ्यांनी बंद केला. पाणी जाण्याचा मार्ग उपलब्ध नसल्याने पाण्याने स्वतःच मार्ग शोधत रस्ता पोखरून टाकला आणि त्यामुळे भला मोठा खड्डा तयार केला. त्यामुळे गिट्टी बाहेर निघाली, डांबरीकरण उघडल्या गेला आणि आता यावरून दुचाकी आणि चार चाकी वाहने निघू शकत नाही ही परिस्थिती निर्माण झालेली असताना कोणताही लोकप्रतिनिधीने याकडे फिरकूनही बघितले नाही. त्यामुळे वेडीच लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी लोकांनी केली आहे.
सदर ठिकाणी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन रस्ता सुरळीत करण्यासाठी मोरी बांधकाम करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच अधिकारी व लोकप्रतिनिधींनी वेळ देऊन रस्ता सुरळीत करावा अशी अपेक्षा लोकांना आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #dhanora #rangi )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here