नितेश महाराष्ट्रातून प्रथम तर विभातून व्दितीय ; रामपूर चक येथे गवसला हिरा

1120

-उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १९ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुका मुख्यालयापासून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या रामपूर (चक) ह्या छोट्याशा गावातील युवक नितेश आनंदराव ढोंगे यांनी महाराष्ट्रातून प्रथम व नागपूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळविल्याने नितेशच्या रूपाने हिरा गवसला असल्याचे गौरवोउद्गार गावातील लोकांकडून केल्या जात आहे. नितेशचा देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री (म.रा.) यांच्या हस्ते मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (म.रा.), दिगंबरजी दळवी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई (म.रा.) यांच्या उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग नागपुर येथे आयोजित पदवीदान समारंभात सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्या हा आदिवासी व मागसलेला असला तरी तिथे उच्च दर्जाची गुणवत्ता असल्याचे नितेशनी मिळविलेल यश यातून प्रकर्षाने दिसून येत आहे. नितेश याने शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज (वडसा), जिल्हा. गडचिरोली येथील “यांत्रिक मोटारगाडी” या व्यवसायामध्ये सत्र जुलै – २०२३ च्या अ. भा. व्य. परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात “यांत्रिक मोटारगाडी” या व्यवसायातून “प्रथम” व नागपूर विभागातून सर्व शाखांमधून (All Trade) “द्वितीय” क्रमांक मिळवीत घवघवीत यश संपादन केले. त्याने आपले प्राथमिक शिक्षण रामपूर(चक) येथील जिप शाळेतून केले व एसएससी तथा एचएससी जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाखरा येथे विज्ञान शाखेतून पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताचीच, परिवारात कुणीही शैक्षणिक मार्गदर्शन करण्यायोग्य उच्च शिक्षित नाहीत, वडील हे मुळात अल्पभूधारक शेतकरी त्यामूळे तो स्वतः मिळेल ते रोजंदारीचे काम करून आपले शिक्षण पूर्ण केले, हे विशेष असून पुढेसुद्धा कमवा व शिका याप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी बनण्याचा प्रयत्न असल्याचे मानस त्याने व्यक्त केला आहे.
पुढे बोलतांना सांगितले की, जेव्हा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज (वडसा), येथे प्रवेश घेतला व पुढील शिक्षण घेण्यासाठी अडचणीचे जात असतांना माझे मामा यांनी सहकार्य केले आहे.
सदर यश प्राप्त केल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेअंतर्गत प्रशिक्षणार्थी, सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कौतुक करत त्याच अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here