The गडविश्व
गडचिरोली, २२ मार्च : चामोर्शी तालुक्यातील रेखेगाव येथे मुक्तिपथ, पोलिस पाटील व ग्रापं समितीने अहिंसक कृती करीत ३० हजार रुपये किंमतीचा ३ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केला.
रेखेगाव या गावात अवैध दारूविक्री केली जाते. या परिसरातील ८ ते १० गावातील मद्यपी या गावामध्ये दारू पिण्यासाठी येतात. त्यामुळे आसपासच्या गावांना त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील नागरिक दारूच्या व्यसनात बुडाले आहेत. अशातच ग्रामपंचायत समिती, मुक्तिपथ चमू व पोलिस पाटील यांनी संयुक्तरित्या अहिंसक कृती करीत एका महिलेच्या घरात आढळून आलेला तीन ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केला. तसेच यापुढे दारूविक्री न करण्याची तंबी दिली. तसेच सदर गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतुन केली जात आहे.
