The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : तालुक्यातील रानभुमी जंगलपरिसरात अहिंसक कृती करीत जवळपास ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केल्याची संयुक्त कृती मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने केली आहे. या कृतीमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
रानभूमी येथील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी लावून मोहफुलाची दारू गाळली जाते. या गावातील विक्रेत्यांच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयासह जवळपासच्या मेंढा, खरपुंडी येथील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा केला जातो. सोबतच परिसरातील दारूविक्री बंदी असलेल्या गावातील मद्यपी या गावामध्ये जाऊन दारूचे व्यसन करतात. अशातच जंगलपरिसरात विक्रेत्यांनी दारूअड्डे लावले असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरित्या जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली असता, ९७ हजार रुपये किमतीचा ११ ड्रम मोहफुलाचा सडवा व दारू गाळण्याचे साहित्य मिळून आला. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)