रस्त्यात असलेला खड्डा बुजविल्याने वृद्धास ८० हजारांचा दंड भरण्याची नोटीस ; प्रकरण काय?

1120

– स्थानिक प्रशासनाने दंड भरण्याची पाठविली नोटीस
The गडविश्व
रोम, १७ मे : रस्त्यात खड्डे असणे ही केवळ आपल्या देशाततील समस्या नसून ती जागतिक आहे. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात मात्र तरीही रस्त्यावरचे खड्डे काही जात नाही, त्याकरिता अनेकदा आंदोलनही होतात मात्र त्याचा तिळमात्र फरक स्थानीक प्रशासनावर होत नसल्याने शेवटी सुजाण नागरिक खड्डे बुजवतात. मात्र अशाचप्रकारे रस्त्यावर पडलेला खड्डा एक निवृत्त वृद्ध इसमाने बुजविल्याने ते अडचणीत आले असून स्थानिक प्रशासनाने त्यांना नोटीस पाठवून ८० हजार रुपयांचा दंड भरण्याची सूचना केली आहे. हे प्रकरण इटलीच्या लोम्बार्डी प्रांतामधील बार्लस्सिना या लहानशा शहरातील असून क्लाऊडिओ ट्रेंटा असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केले आहे.
ट्रेंटा यांच्या घराजवळील झेब्रा क्रॉसिंगवर ३० सेंटिमीटरचा खड्डा पडला होता. ट्रेंटा यांनी हा खड्डा कोल्ड बिटुमनचा वापर करुन बुजवला. यानंतर प्रशासनानं ट्रेंटा यांना नोटीस पाठवली आणि ९०० युरोंचा ( ८० हजार) रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. तर हायवे कोडचे
उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून सार्वजनिक ठिकाणी धोकादायक काम कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय केल्याचे प्रशासनानं नोटिशीत नमूद केले आहे. तर ट्रेंटा यांच्यावरील कारवाईमुळे इटलीतील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून आपल्याला नोटिस पाठवणाऱ्या प्रशासनालाच आपणच नोटिस पाठवणार असल्याचे ट्रेंटा यांनी सांगितले आहे. रस्त्यावर असलेला खड्डा तुम्ही बुजवलात. तो पूर्ववत करा, असे प्रशासनाने नोटिशीत म्हटले आहे. ‘त्यांना मी मूर्ख वाटत असेन, तर त्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांनी मला डिवचले आहे. आता मी प्रशासनाला नोटिस पाठवणार आहे. कारण खड्ड्यामुळे प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे,’ असे ट्रेंटा म्हणाले.
तसेच ट्रेंटा यांनी याबद्दल एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. खड्डा बुजवण्यात यावा यासाठी मी पाठपुरावा केला. मात्र तीन महिने उलटून गेल्यावरही काहीच झाले नाही. त्यामुळे मीच खड्डा बुजवला. ट्रेंटा यांना फेसबुकवर संपूर्ण देशातून पाठिंबा मिळलाा आहे. अनेकांनी प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here