– शेतपिकांचे अतोनात नुकसान, झोपड्याही केली नासधूस
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २२ एप्रिल : छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने आता कुरखेडा तालुक्यात एन्ट्री केली असून तालुक्यातील जामटोला परिसरात बुधवारी धुमाकूळ माजवला.
गतवर्षी रानटी हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दरम्यान जिल्ह्यातून हत्तींचा कळप छत्तीसगड राज्यात परतला होता. मात्र आता पुन्हा हत्तींच्या कळपाने यु टर्न घेत १५ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील मुरुमगाव पूर्व वनपरिक्षेत्रातील एन्ट्री केली असून आता कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्रात मुक्कामी असल्याचे कळते. तर या कळपाकडून नुकसानीचे सत्र सुरूच असून शेतशिवरातील धानपिकासह झोपड्यांचे नुकसान केले आहे. आनंदराव मडावी यांच्या शेतशिवारातील झोपडीची व उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर तुकाराम नैताम, कलीराम होळी यांच्या शेतपिकासह कैलास मडावी यांची झोपडी व पिकांचे अतोनात नुकसान हत्तींच्या कळपाने केले आहे. हत्तींच्या पुनरागमनाने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून दाहशतीत असून नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हत्तींच्या आगमनाने मात्र वनविभागाची दमछाक उडत आहे.
(the gadvishva) (the gdv) (elephants entry kurkheda tahsil gadchiroli)