आता नक्षल्यांनी जिओ टॉवरला लावली आग : नेटवर्क ठप्प

3348

– २ ते ८ डिसेंबर पीएलजीए सप्ताह साजरा करण्याचे पत्रकातून केले आवाहन
The गडविश्व
बस्तर, दि.२९ : दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या हर्राकोडर येथे जिओ टॉवरला नक्षल्यांनी आग लावल्याची घटना पुढे येते आहे. २ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षली पीएलजीए सप्ताह साजरा करणार असून त्याबाबतचे पत्रकही घटनास्थळी टाकले आहे. या घटनेने परिसरात पुन्हा दहशत पसरली असून परिसरातील जिओ नेटवर्क ठप्प झाला आहे.
हर्राकोडर हे दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले नक्षलग्रस्त गाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा सुमारे ५ ते ७ नक्षली त्याठिकाणी पोहचून जिओ टॉवर आणि जनरेटरला आग लागली. घटनेची माहिती सकाळी पोलिसांना मिळताच घटनास्थळी जवान पाठवण्यात आल्याचे कळते. तर घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रकही टाकले आहेत. ज्यामध्ये पीएलजीए सप्ताह साजरा करण्याबाबत लिहिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here