आता निवृत्तीवेतन मिळणार ई-कुबेर प्रणालीद्वारे

174

The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे मार्च-2024 पासून पुढील निवृत्तीवेतन व कुटूंबनिवृत्तीवेतनाचे प्रदान आता दरमाह ई-कुबेर प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी कोषागाराचे निवृत्तीवेतन प्रणालीत ज्या बँकेची नोंद केली आहे ते खाते सुरू राहील याची दक्षता घ्यावी. तसेच ज्यांनी कोषागारास न कळविता परस्पर निवृत्तीवेतन खाते बदल केला आहे त्या निवृत्तीवेतनधारकांनी बँकेचा आय.एफ.एस.सी. कोड व खाते क्रमांक कोषागार प्रणालीत अद्यावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी लक्ष्मण लिंगालोड यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here