– क्रशर मशीन आगीच्या भक्षात, इतरही साहित्यांची केली जाळपोळ
The गडविश्व
बिजापूर, ११ मार्च : छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी धुमाकूळ माजवला असून बिजापूर जिल्ह्यात क्रेशर प्लांटमधील मशीनला आग लावून जाळपोळ केल्याची घटना पुढे येत आहे.
बिजापूर जिल्ह्यातील आवापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवापल्ली -बासागुडा मार्गावरील मुरदोंडा येथील क्रेशर प्लांटमधील मशीनची गुरुवारी रात्रोच्या सुमारास आग आळवून जाळपोळ केल्याचे बोलल्या जात आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास जेव्हा मजूर कामासाठी येथे पोहोचले असता त्यांना मशीन जळत असल्याचे दिसले. घटनेची माहिती दिली असता आवापल्ली पोलीस ठाण्याचे जवान घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. नक्षल्यांनी दुसऱ्यांदा या क्रेशर प्लांटला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेने क्रेशर प्लांट मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे.