शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा एन.एस.एस. शिबिराचे डीप्राटोला येथे उद्घाटन

35

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २३ : शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर तथा श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन आज सोमवार २३ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर डिप्राटोला येथे पार पडला .
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटक म्हणून कुरखेडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राजकुमार धनबाते हे उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून कुरखेडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, नान्ही ग्रामपंचायत चे सरपंच चंद्रभान हुंडराझ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका एम.बी.शेडमाकेझ नान्ही ग्रामपंचायत चे उपसरपंच रुपचंद कापगते, स्वर्णदीप कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राध्यापक संतोष मेश्राम, मंडळ अधिकारी खरकाटे, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कार्यक्रम अधिकारी विजय मेश्राम, विद्यार्थी शिबीर प्रमुख मयूर गेडाम, विद्यार्थिनी शिबीर प्रमुख उर्वशी सहारे हे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यावर्षी डिप्राटोला या गावची निवड २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे. या शिबिरादरम्यान ग्रामसाठी युवक, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, आपत्ती व्यवस्थापन शोषखड्डा निर्मिती जलसंवर्धन जनजागृती, पायवाट नूतनीकरणासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी शिबिरार्थ्यांना आपल्या विद्यार्थी जीवनातून स्वत:च्या आई- वडील यांच्याकरिता, गुरुजन, स्वत:च्या गावाकरिता, स्वत:च्या जिल्ह्याच्या विकासाकरिता काय करू शकता या विषयी व वैयक्तिक आणि शिबिरासाठी व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करा आपल्या मार्ग्दर्शांनातून म्हटले.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटक म्हणून कुरखेडा तहसीलचे नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिबिरार्थ्यांना तथा डीप्राटोला वासियांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ( ग्रामसाठी युवक ) कशारीतीने यशस्वी पार पाडता येईल या विषयी व शिबिरार्थ्यांना आपापसात सामाजिक आणि नागरी जबाबदारीची भावना विकसित करावी या बद्दल मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी आपल्या मार्गदर्शनातून कॅम्पस आणि समुदाय यांच्यात अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली. जोपर्यंत विद्यार्थी तरुणांना गावे / समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्यास प्रवृत्त होत नाही तोपर्यंत देश अपेक्षित दिशेने प्रगती करू शकत नाही. राष्ट्रीय पुनर्रचना आणि राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी शिबिरार्थी हे योग्यरित्या संवेदनशील बनले पाहिजे आणि ग्रामीण समुदायावर विशेष भर देऊन संपूर्ण भारतीय समाज मजबूत करण्यासाठी वापरला गेला पाहिजे असे व्यक्त केले.
सदर उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय मेश्राम व सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज सराटे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक स्वप्नील खेवले यांनी केले .
उद्घाटन सोहळा यशस्वी पार पाडण्याकरीता विद्यालयातील प्राध्यापक कालिदास सोरते, रुपेश भोयर, गुरुदास शेंडे, मुनेश्वर राऊत, विवेक गलबले, आलाम व शिक्षकेत्तर कर्मचारी शिवा भोयर, अक्षय देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना चे शिबिरार्थी तथा समस्त डीप्राटोला वासियांनी सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here