अरे भाऊ, पेसा प्रमाणत्रासाठी बेरोजगारच पोहचला नं शासनाच्या दारी

878

– गडचिरोली जिल्हा मुख्यालयी उसळली गर्दी, अर्ज करण्यास उरले फक्त काही दिवस
The गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना राबवित प्रत्येक जिल्हयात कागदपत्रे तसेच इतर योजनांचा लाभ मिळवून दिला मात्र तलाठी पदभरतीच्या अर्जा साठी आवश्यक असलेल्या पेसा प्रमाणपत्राकरिता मात्र बेरोजगार हा ‘शासनाच्या दारी पोहचतांना’ दिसत असल्याने “अरे भाऊ, पेसा प्रमाणत्रासाठी बेरोजगारच पोहचला नं शासनाच्या दारी” अशी हाकही बरोजगार देतांना दिसत आहे.
२६ जून पासून राज्यातील तलाठी पदभरती करीता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्हयात पेसा अंतर्गत अधिक पदे असल्याने जिल्हयातील पेसा क्षेत्रातील बेरोजगार हा अर्ज भरण्यास धरपडत आहे. मात्र सदर अर्ज दाखल करण्याकरिता आवश्यक असलेला पेसा प्रमाणपत्राकरिता जिल्हा मुख्यालयातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात धाव घेतांना दिसुन येत आहे. या प्रमाणपत्राकरिता होत असलेली धरपळ बघता राज्य शासनाव्दारे राज्यभरात राबविण्यात येणारी ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना कुचकामी ठरत असल्याचे दिसुन येत आहे. बेरोजगारांची होत असलेली धरपड व प्रमाणपत्राकरीता मारत असलेल्या चकरा बघता ‘बेरोजगाराच शासनाच्या दारी पोहचला’ असे म्हणायला हरकत नाही.
नुकताच ८ जुलै रोजी गडचिरोली येथे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला हजर झाले असता ‘शासन आता आपल्या दारी पोहचले आहे त्यामुळे ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ असे आता होणार नाही तर शासकीय काम अधिक जलद गतीने केले जाईल असे या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलले होते. मात्र ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना या ठिकाणी कुठेही दिसून येत नसून ‘शासन आपल्या दारी’ बाबत बेरोजगारांमध्ये नाराजी होत असल्याचे दिसुन येत आहे. पेसा प्रमाणपत्राकरिता जिल्हा मुख्यालयातील एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात धाव घेत अर्ज दाखल करावे लगात आहे तसेच अर्ज दाखल केल्यानंतर दोन ते तिन दिवसांचा कालावधी लागत आहे. तसेच आपले प्रमाणपत्र तयार झाले याची यादी ही केवळ कार्यालयातच लावली जात असल्याने प्रमाणत्र तयार झाल्याच्या यादीत नाव असल्यास प्रमाणपत्र घेवून जाता येत आहे. त्यामुळे जर यादी पहावयास आल्यानंतर प्रमाणपत्र तयार झालेला नसल्यास खाली हात परतावे लागत आहे याचा भुर्दंड मात्र बेरोजगाराला सहन करावा लागत आहे. देशभारत डिजिटल इंडिया संकल्पना राबविण्यात येत आहे. आज अनेक कामे ऑनलाईन झाले आहे, अर्जही ऑनलाईन करायचे आहे त्यामुळे सदर प्रमाणपत्र ऑनलाईन मिळाल्यास सोयिस्कर होईल असेही बेरोजगारांचे म्हणणे आहे.

यादी ऑनलाईन संकेतस्थळावर देण्यात यावी

उमेदवाराला आपला पेसा प्रमाणपत्र मिळण्याचा अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात दाखल केल्यानंतर दोन ते तिन दिवस वाट पहावी लागत आहे. त्यानंतर सदर प्रमाणपत्र तयार झाल्याची यादी ही केवळ त्याच कार्यालयात भिंतीवर चिकटविल्या जात असल्याने उमेदवारांना ती यादी पाहणे सोयिस्कर नाही. जिल्हयातील अनेक उमेदवार अर्ज केले असल्याने यादी बघितल्यानंतर आपले नाव न दिसल्यास मात्र त्याला खाली हात परतावे लागत आहे त्यामुळे त्याला पुन्हा अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र तयार झाल्याची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केल्यास उमेदवार त्या यादीमध्ये ऑनलाईनरीत्या आपले नाव शोधून प्रमाणपत्राकरिता कार्यालयात हजर होणार. यामुळे गर्दीही कमी होण्यास मदत होईल. अशी मागणीही उमेदवारांकडून होतांना दिसत आहे.

पेसा प्रमानपत्राऐवजी आता शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, स्वयंघोषणापत्र ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करता येणार आहे.

(the gadvishva, gadchiroli news, pesa, talthi bharti 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here