The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ७ जानेवारी : आदर्श पत्रकार संघ धानोऱ्याच्या वतीने शुक्रवार ६ जानेवारी २०२३ रोजी जे.एस.पी.एम. कॉलेज धानोरा येथील सभागृहात चार कोरोना युद्धांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून नगरपंचायत उपाध्यक्ष ललितजी बरच्छा, प्रमुख अतिथी म्हणून शाखा व्यवस्थापक एसबीआय धानोरा प्रदीप खेडेकर, अध्यक्ष तालुका पत्रकार संघ समीर कुरेशी हे उपस्थित होते.
कोरोना कालावधीत ज्या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या स्वतःच्या प्राण्याची तमा न बाळगता कोरोना पेशंटला वेळोवेळी सहकार्य करून इतर लोकांनाही तेवढ्याच तत्परतेने सहकार्याची भूमिका ठेवणारे गणेश कुळमेथे, महेश हंगे, बालाजी कोकणे तसेच जमीर शेख तालुका स्वस्त धान्य दुकानदार अध्यक्ष यांचा आदर्श पत्रकार संघ धानोऱ्याच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कोरोना कालावधी मध्ये या लोकांनी आपला अमूल्य वेळ देऊन प्राण्याची बाजी जीवावर लावली. कोरोना पेशंटला वेळोवेळी योग्य उपचार देऊन इतरांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कार्य लक्षात घेत धानोरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच धानोरा तालुका स्वस्त धान्य दुकानदार यांचा सुद्ध सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालण दिवाकर भोयर यांनी केले तर आभार भाविकदास करमनकर यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.