०२ मार्च ला कायदेविषयक महाशिबीर, शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

320

The गडविश्व
गडचिरोली, दि.२७ : कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी गडचिरोली जिल्हयामध्ये नागरीकांना विधी सेवा व शासकीय योजनांची माहिती देण्याकरीता महाशिबीर आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने सदरचे महाशिबीर हे गडचिरोली न्यायीक जिल्हयाचे पालक न्यायमुर्ती न्यायमुर्ती एम. डब्ल्यु. चांदवानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात येत आहे. “कायदेविषयक महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा” चे आयोजन ०२ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे करण्यात येत आहे.
जिल्हयातील सर्व नागरीकांनी कायदेविषयक साक्षर व्हावे तसेच शासनाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती मार्फत गरजु व सामान्य नागरीकांना पुरविण्यात येणाऱ्या कायदेविषयक सहाय्याची व योजनाची माहिती सर्व नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करते.
सदर महाशिबीरास पालक न्यायमुर्ती एम. डब्ल्यु. चांदवाणी, उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, ए.एन. करमरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली, संजय मीना, जिल्हाधिकारी, गडचिरोली, निलोत्पल, पोलीस अधिक्षक, गडचिरोली, श्रीमती. आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध शासकीय विभागाच्या योजनांची माहिती व प्रसार होण्याच्या दृष्टीने त्या-त्या विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. तसेच विविध योजनेतील पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.
सदरहू शासकीय योजनांचा महामेळाव्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here