१८ सप्टेंबरला ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार व त्वचाविकार तपासणी शिबीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात बुधवार १८ सप्टेम्बर २०२४ ला मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेषज्ञ ओपीडी करीता दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील विशेषज्ञ सर्च रुग्णालय चातगाव येथे रुग्णसेवा देण्या करीता येणार आहेत.
मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन, मूत्राशय पिशवी मध्ये स्टोन असणे,लघवीची नळी चिपकलेली असणे , मूत्राशय नळीमध्ये स्टोन अटकलेला असणे , प्रोटेस्ट ग्रंथीची वाढ होणे तसेच लघवीतून रक्त जाणे, लघवी अटकत/ थांबत येणे अशी लक्षणे असल्यास मूत्रविकार तज्ञांचे मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच शरीरावर पांढरा चट्टा कोड व खाज, मुरूम/ तारुण्यपिटिका, केस गळती,कोंडा होणे, गजकर्ण, खरूज, सोरायसिस, नखांचे आजार तसेच नागिन अशी लक्षणे असल्यास त्वचाविकार ओपीडी मध्ये उपचार सुविधा उपलब्ध केली आहे.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. तरी बुधवार दिनांक- १८ सप्टेम्बर रोजी होणार्या मुत्रविकार व त्वचाविकार ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )