The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २८ : तालुक्यातील गेवर्धा तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगल विवाहबंधनात अडकले आहे. अनिल शामराव दहिकर असे वराचे नाव असून भाग्यश्री बाळकृष्ण मेश्राम असे वधूचे नाव आहे.
कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील अनिल दहिकर याचे गावातीलच भाग्यश्री मेश्राम हिच्याशी प्रेम संबंध जुळले. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले मात्र दोघांच्याही घरातील व्यक्तींचा लग्नाला विरोध होता. अनिल आणि भाग्यश्री यांनी रीतसर तंटामुक्त समिती गेवर्धा येथे विवाहासाठी अर्ज केला. अर्जाची तसेच त्यांच्या वयाची पडताळणी करून तंमुस ने ग्रामपंचायत सभागृह गेवर्धा येथे विवाह लाऊन दिला.
यावेळी तंमुस अध्यक्ष राजू बारई, भाग्यरेखाताई वझाडे पोलिस पाटिल गेवर्धा, सुधीर बालबुद्धे सदस्य तंमुस, ताहिर शेख सदस्य तंमुस, राजेंद्र कुमरे सदस्य तंमुस, भोला भाई पठान माजी अध्यक्ष तंमुस, संदीप कुमरे अध्यक्ष शाला व्यवस्थापण समिती, सुनील कीन्नाके माजी सदस्य ग्रामपंचायत व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #gewardha)