– बाईक रॅलीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सारथ्य- 550 पोलीस अधिकारी/ अंमलदारांचा सहभाग
– जिल्ह्रातील सर्व एकुण १० उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व 64 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे जनजागरण मेळावा व दहा हजार वृक्ष लागवड संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : आदिवासी म्हणजे सांस्कृतिक, भाषा, कला, साहित्याने श्रीमंत असणारा समाज होय. या आदिम संस्कृतीचे जतन व्हावे याकरीता संयुक्त राष्ट्र संघाने सन- 1994 पासुन 09 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणुन घोषित केले आहे. तेव्हा पासुन 09 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणुन साजरा केला जातो. तसेच ब्रिाटिश सत्तेच्या गुलामगिरीतुन देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांची आठवण व त्यांच्या त्यागाची जाणीव राहावी याकरीता तसेच ‘छोडो भारत’ आंदोलनाचा हा दिवस क्रांती दिन म्हणुन साजरा केला जातो.
त्याच पार्श्वभूमीवर आज 09 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमीत्य पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकुण 550 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. बाईक रॅली समारोह एम.आय.डी.सी पटांगण येथे पार पडला. त्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी एम.आय.डी.सी. पटांगणावर वृक्षारोपण केले. यासोबतच जिल्ह्रातील सर्व उपविभाग तसेच सर्व पोस्टे/उपपोस्टे व पोमकें स्तरावर दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
यासोबतच गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. विविध खेळांच्या स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी ‘स्वयंसिद्ध’ (कराटे) प्रशिक्षणाचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील शहिद पांडू आलाम सभागृहामध्ये करण्यात आले.
सदर आयोजित स्वयंसिद्ध (कराटे) प्रशिक्षणामध्ये अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली व हेडरी उपविभागातुन एकुण 82 युवतींनी आपला सहभाग नोंदविला आहे. आज ९ ऑगस्ट पासुन एकुण 10 दिवस आयोजित या स्वयंसिद्ध (कराटे) प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंसिद्धचे (कराटे) प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्धाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्वयंसिद्ध (कराटे) चे किट वाटप करण्यात आले. त्यानंतर स्वयंसिद्धचे (कराटे) प्रशिक्षण देणारे कौशल्य स्पोट्र्स अकॅडमी गडचिरोलीचे प्रशिक्षक प्रशिक रायपूरे व सेजल गद्देवार यांनी आत्मसंरक्षणपर प्रात्यक्षिक दाखविले. यासोबतच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, स्वयंसिद्धचे (कराटे) प्रशिक्षण हे अत्यंत महत्वाचे प्रशिक्षण आहे व हे प्रशिक्षण फक्त तुम्हाला वाचविण्यासाठी नसून तुमचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी आवडीने सहभागी होऊन सदरचे प्रशिक्षण पूर्ण करुन स्वत:ला आत्मनिर्भर करावे असे आवाहन केले.
यासोबतच गडचिरोली जिल्हयातील गरजु व सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या व त्यांना अत्याधुनिक कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र (स्किलिंग इन्स्टिटयुट) ची सुरुवात करण्यात आली होती. या स्किलींग इन्स्टिटयुटच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना सॉफ्टवेअर व वेब डेव्हलपरचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील माओवादग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत गरजु बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडाण अंतर्गत व बिओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक युवक-युवतींना फास्टफुड व मत्स्यपालन प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे सर्व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज ९ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पडला.
सदरचे सॉफ्टवेअर व वेब डेव्हलोपर प्रशिक्षण २० मे ते ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत एकुण 70 दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये दुर्गम-अतिदुर्गम भागातील एकुण 150 युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये 120 प्रशिक्षणार्थ्यांनी सॉफ्टवेअर व 30 प्रशिक्षणार्थ्यांनी वेब डेव्हलपरचे प्रशिक्षण घेतले. तसेच फास्टफुड व मत्स्यपालनचे प्रशिक्षण १ ते १० ऑगस्ट पर्यंत एकुण 10 दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते. या 10 दिवस चाललेल्या प्रशिक्षणामध्ये फास्टफुडचे 35 व मत्स्यपालनचे 30 युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये फास्टफुडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते फास्टफुड किट व मत्स्यपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे मत्स्यबीज वाटप करण्यात आले. सर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करुन ती गोष्ट साध्य होईपर्यंत प्रयत्न करावा. तसेच स्किलींग इन्स्टिटयुटच्या माध्यमातून दिल्या जाणाया बेसिक ट्रेनिंगचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घेऊन त्याद्वारे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करुन आपला विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमीत्त गडचिरोली जिल्हयातील संपुर्ण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आज ‘RUN FOR TRIBAL’ मॅराथॉन, जनजागरण मेळावे, विविध स्पर्धा, रॅली, रेलानृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याकरीता सन 2021 पासुन पोलीस दादालोरा खिडकीची स्थापना करण्यात आली असुन माहे जुलै 2024 पर्यंत विविध शासकीय योजनांचे एकुण 7,12,886 लाभार्थ्यांना लाभ पोहचविण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले.
यावेळी सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, योगेश शेंडे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग गडचिरोली, कैलास बोलगमवार, संचालक, आरसेटी गडचिरोली हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच प्रभारी अधिकारी नागरी कृती शाखा पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )