The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या क्षेत्रातील पाणी वापर संस्था अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि सेवावर्धिनी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनः आव्हाने व उपाय” या विषयावर सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.००, सिध्दार्थ सभागृह, चंद्रपूर वन प्रशासन, विकास, संशोधन व व्यवस्थापन प्रबोधिनी, मूल रोड, चंद्रपूर येथे एकदिवसीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेच्या सोहळ्यास उद्घाटक म्हणून मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र ना.सुधीर मुनगंटीवार, अध्यक्षस्थानी कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ.प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून संचालक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास, संशोधन व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर एम. श्रीनिवासा रेड्डी (IFS) संचालक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास, संशोधन व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर, कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे वि. महा., नागपूर,. रा.सोनटक्के प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे, सचिव, सेवावर्धिनी संस्था, पुणे, सोमदत्त पटवर्धन, कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ.अनिल हिरेखण आदींची उपस्थिती राहणार आहे.
या विषयांवर होणार चर्चासत्र
निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, किशोर एकनाथजी वरंभे यांचे ‘लोकसहभागीय पाणी व्यवस्थापन कायदा व लोकांच्या जबाबदाऱ्या’, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, ए. व्ही. फरकाडे यांचे ‘गोसेखुर्द प्रकल्पाचे विस्तृत विवेचन’, मत्स्य व्यवस्थापन तज्ज्ञ तथा माजी सदस्य, सिंचन आयोग महाराष्ट्र,डॉ. उल्हास फडके, ‘पाणी वापर संस्था सक्षमीकरण उद्देश व वास्तव’ या विषयांवर व्याख्यान होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन या कार्यशाळेचे समन्वयक तसेच अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ.अनिल चिताडे , सहसमन्वयक वरीष्ठ प्रकल्प सहयोगी सेवावर्धिनी संस्था, पुणे प्रसाद देशपांडे यांनी केले आहे.