दारूविक्री विरोधात लढा उभारण्यासाठी दाखवली एकी

222

-मुक्तिपथ मॅरेथॉनमध्ये धावले २७९ स्पर्धक
The गडविश्व
गडचिरोली, १६ डिसेंबर : चामोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव संघटनेच्या वतीने मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण २७९ स्पर्धकांनी सहभाग घेत अवैध दारूविक्री विरोधात लढा उभारण्यासाठी एकी दाखवली आहे.
चामोर्शी तालुक्यातील ठाकुरनगर ४७, खंडाळा ३८, कान्होली ६२, मूरखळा माल ३७, नागपूर चेक ५२, सोनापूर ४३ या सहाही गावातील एकूण २७९ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेची सुरवात गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. स्पर्धा बघण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती. या निमित्ताने एकत्र जमलेले खेळाडू व उपस्थित प्रेक्षक यांना सुरुवातीला दारू व तंबाखू सेवन करणार नाही याबाबत संकल्प देण्यात आला. गावात अवैध दारू व तंबाखू विक्री सुरु आहे कि, बंद आहे यावर चर्चा करत, विक्री बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कृती केली पाहिजे, याबाबत चामोर्शीचे तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सीडाम यांनी मार्गदर्शन केले. त्यांनतर स्पर्धेत विविध गटातून अव्वल येणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पार्क कार्यकर्ती सोनी सहारे, प्रियंका भूरले यांच्यासह गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Kuldeep Yadav) (Govinda Naam Mera) (Thailand Princess Bajrakitiyabha) (Horoscope) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here