‘तरच’ बँक खात्यामध्ये जमा होणार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे

2895

The गडविश्व
गडचिरोली दि. १४ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू असुन याचा लाभ अनेक महिलांना मिळणार आहे. महिन्याला १ हजार ५०० रुपये योजनेस पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा होणार आहे. परंतु पात्र लाभार्थी महिलेच बँक खाते आधार कार्ड संलग्न नसेल किवा खातेदारांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या खात्यावर जमा होणार नाहीत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गडचिरोली जिल्ह्यात 1 लाख 56 हजार ऑनलाईन प्राप्त झाले असून त्यापैकी 1 लाख 53 हजार 164 अर्ज मंजूर करुन राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यावर लवकरच डिबीटीद्वारे निधी वितरीत केला जाणार आहे. यासाठी लाभार्थीचे बॅंक खाते हे आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तरी ज्या लाभार्थींचे खाते आधार कार्ड संलग्न नसेल किवा खातेदारांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या खात्यावर या योजनेचा निधी जमा होण्यासाठी संबधित लाभार्थींनी आपले खाते ई-केवायसी केल्याची पडताळणी करावी. लाभार्थी बॅंक खाते आधार कार्ड संलग्न करण्यासाठी संबधित महिला लाभार्थी यांनी त्यांचे बॅंक खाते असलेल्या बॅंक शाखेत, बँक व्यवसायीक मित्र, सेतु केंद्र व बँक सुविधा केंद्र येथे तातडीने संपर्क करुन आपले बॅंक खाते आधार कार्ड संलग्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #mukhymantri majhi ladki bahin yojna )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here