The गडविश्व
गडचिरोली, २९ मार्च : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की,जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात सोमवार, ३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यत राहील आणि सभेला ३.०० वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर ३ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-१ अ ते १ ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, तसेच ३ एप्रिल २०२३ रोजी व्हिडीओ कॉन्फन्सद्वारे प्राप्त निर्देशान्वये विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, गडचिरोली येथे प्राप्त् होणाऱ्या तक्रारीवर जलद गतीने निराकरण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राप्त तक्रारीबाबत संबंधित कार्यालय प्रमुखाकडुन आढावा घेण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली यांनी कळविले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News) (Lokshahi din)