– गडचिरोली येथे २८ ला तर आलापल्ली येथे २७ ऑगस्ट ला शिबिर
– The गडविश्व
गडचिरोली, २३ ऑगस्ट : भारतात दरवर्षी जवळपास 1.60 लाख व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. वाहन चालकांना वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. सबब परिवहन उपआयुक्त (रस्ता सुरक्षा कक्ष), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेत्र शिबीराचे आयोजन करण्याकरीता आदेशित केलेले आहे.
27 ऑगस्ट 2023 रोजी आरोग्य वर्धिनी केंद्र, आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली येथे तर 28 ऑगस्ट 2023 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर घेण्याचा या कार्यालयाचा मानस आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा संघटना, सर्व वाहतुकदार, बस, ट्रक चालक, एस.टी.चालक- वाहक यांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.