The गडविश्व
धानोरा, १४ ऑगस्ट : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे पोलीस मदत केंद्रातील ११३ बटालियन कमांडेट जशविरसिंग व सशीभुसन यादव सहाय्यक कमांडेट यांच्या मार्गदर्शनात ११३ बटालियन यांनी १३ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपक्रम “मेरी माटी मेरा देश” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सहाय्यक कमांडर सशीभुसन यादव यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण केले. तसेच विद्यार्थ्यांना व समस्त नागरिकांना झाडाचे महत्व समजाऊन सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी राहुल बंसोड, शिवप्रसाद गवर्णा सरपंच व गावकरी नागरिक उपस्थित होते.