The गडविश्व
कोंढाळा, दि. ११ : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा युवा वीर मराठा मंडळातर्फे येत्या १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ११ फेब्रुवारी पासूनच जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
येणाऱ्या जयंती दिनाचे औचित्य साधून विविध2 स्पर्धांचे आयोजन करून १८ फेब्रुवारीला बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याने आतापासूनच विद्या निकेतन लोकमान्य टिळक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेच्या सुरुवातीला गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत चित्रकला, निबंध, वकृत्व, सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील १७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दरम्यान ग्रामपंचायतच्या सरपंचा अपर्णा नितिन राऊत, सुनील पारधी भाजपा तालुकाध्यक्ष, नितीन राऊत माजी उपसभाती, अनिल मुलकलवार मुख्यधापाक जिल्हा परिषद शाळा, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, प्रदीप तुपट सर , एन. आय आर.डी यंग फेलोचे निखिल गोरे, संदीप साबळे , जयंत दुपारे, रोशन ठाकरे , अजय चंद्रवंशी, आशिष दोनाडकर, नंदू बेहरे,संदीप ढोंगे, अतुल वनस्कार, विवेक राऊत, विकास राऊत, अक्रोश शेंडे, छत्रपती ढोरे, मदन पचारे, तारकेश्वर झिलपे , विकास मोहुर्ले, सूरज झिलपे, अजय भरें, विवेक झिलपे , तगावातील विद्यार्थी, युवा वीर मराठा मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या १८ व १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फ करण्यात आले आहे.
येत्या १८ फेब्रुवारी ला वेशभूषा स्पर्धा, धावण्याची स्पर्धा, नृत्य इतर स्पर्धा आणि ११ तारखेला घेतलेल्या स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस देण्यात येईल व १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त महिलांकरीता रांगोळी स्पर्धा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात येणार असल्याचे युवा वीर मराठा मंडळाचे नितेश पाटील यांनी सांगितले.