– हजारोंच्या संख्येत कुणबी समाज एकवटला
The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑक्टोबर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कुणबी समाजाच्या वतीने विविध मागण्यांकरीता ५ ऑक्टोबर रोजी कुणबी महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने कुणबी समाजबांधव उपस्थित झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात, विविध घोषणा देत शिवाजी महाविद्यालयातुन मोर्चा जिल्हाधिकारि कार्यालय परिसरात पोहचला. दरम्यान यावेळी काही लोकप्रतिनिधी, आमदार यांचीही उपस्थिती होती. दरम्यान काही वेळानेच मोर्चा स्थळी एका समाज बांधवाद्वारे आमदार, खासदारांचा निषेध करीत त्यांना या ठिकाणी बसू देऊ नये असे अन्यथा त्यांचे कपडे उतरवू असे वक्तव्य केले. त्यामुळे काही काळ मोर्चातील समाज बंधवही त्याला पाठिंबा दर्शवित होते. दरम्यान यावेळी समाजातीलच विद्यार्थ्यांनमार्फत मार्गदर्शन व भाषणे झालीत. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मोर्चाच्या काही दिवसांपासूनच शहरात सत्ताधारी व विरोधक तसेच विविध पुढाऱ्यांमार्फत बॅनर होर्डिंग लावून मोर्चाला पाठिंबा दर्शविला व मोर्चात येणाऱ्या समाजबांधवांचे स्वागत केले. मात्र हीच पुढाऱ्यांची बॅनर होर्डिंगबाजी शहरात चर्चेचा विषय ठरली होती. जणू बॅनर लावण्यात पैजच लागली की काय अशा पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आल्याचे चित्र होते तर याकडे सर्वांचे नजराही खिळल्या होत्या. पुढाऱ्यांनी बॅनरबाजी केली असली तरी मात्र काही पुढारी मोर्चात अनुपस्थितीत होते त्यामुळे त्यांचा केवळ बॅनर होर्डिंगच्या माध्यमातूनच सहभाग दिसून आला. इंदिरा गांधी चौकात सर्वत्र बॅनरच बॅनर दिसून येत होते. जे सरकार सत्तेत आहे त्या पक्षातील पुढाऱ्यांचेही आणि विरोधात आहेत त्यांचेही बॅनर होर्डिंग दिसून येत होते. त्यामुळे नेमका कोण काय कोणाकडे मागणी करीत आहे असा सवालही अनेकांना उपस्थित झाला तर केवळ निवडणुका पुढे असल्याने हे केवळ देखावा तर नाही असा सुरही कमी आवाजात उमटत होता. दरम्यान मोर्चात काही आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित झाले होते मात्र त्यांच्या या उपस्थितीवरही समाज बांधव काही प्रमाणात नाराज दिसून आले होते. तर त्यांचा निषेधही या ठिकाणी करण्यात आला. एकूणच मोर्चात गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कुणबी समाज मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता. मोर्चात सहभागी समाज बांधवांसाठी शिवाजी महाविद्यालयात ते जिल्हाधिकारि कार्यालय परिसरातील मार्गावर ठिकठिकाणी फळे, सरबत, पाणी, अल्पोपहार ची सोय करण्यात आली होती. मोर्चाचे समारोप समारोप राष्ट्रगीताने करण्यात आली. तदनंतर समाजबांधवांकरिता आयटीआय समोरील परिसरात अल्पोपहार ची सोय करण्यात आली होती. मोर्चा दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफार तैनात करण्यात आला होता कडक बंदोबस्तात हा मोर्चा पार पडला.
या होत्या मागण्या
– राज्यशासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये
(१) बिहारच्या धर्तीवर राज्यात सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
२) महामहिम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यासह इतर १२ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ओबीसींचे १७ संवर्गीय पदाचे आरक्षण शून्य झाले असून हे असंविधानिक आहे. हा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय असून तो तात्काळ दूर करण्यात यावा.
3) गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे.
४) सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात येऊन सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये.
५) सारथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तात्काळ सुरू करण्यात याव्यात.
६) अल्पसंख्यांक संस्थांना त्यांच्या आस्थापनेतील रिक्त पदभरतीसाठी देण्यात आलेली सूट, बहुजन समाजातील संस्थांना सुद्धा देण्यात यावी.
७) राज्यात ओबीसींसाठी मंजूर असलेले ७२ वसतिगृह तत्काळ सुरू करण्यात यावे व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावे.
८) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा तात्काळ लागू कराव्यात.
९) थानाला प्रती क्विंटल रु. ४,०००/- हमी भाव द्यावा.
१०) कुणबी समाजाला ॲट्रसिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे.
११) कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा.
(the gdv, the gadvishva, gadchiroli kunbi mahamorcha, gadchiroli news)