The गडविश्व
ता.प्र /कुरखेडा, दि. ०६ : ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासन निर्णय क्रमांक व्हीपीएम-2011/प्र क्र.6/पं रा.3 दिनांक 26/4/11 नुसार ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) प्रकल्पाची उभारणी झालेली असून शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत मध्ये केंद्र चालक (VLE), पंचायत समिती स्तरावर तालुका को-ऑर्डिनेटर(TC) आणि जिल्हा परिषद मध्ये जिल्हा को-ऑर्डिनेटर(DC)पद अस्तित्वात होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासन निर्णय क्रमांक संग्राम-2015 प्र क्र 93 संग्राम कक्ष दिनांक 11/8/2016 नुसार आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करून ग्रामपंचायत मध्ये केंद्र चालक (VLE ), पंचायत समिती स्तरावर तालुका व्यवस्थापक (BM) आणि जिल्हा परिषद मध्ये जिल्हा व्यवस्थापक (DM )आणि हार्डवेअर इंजिनियर (DHE) पदावर कार्यरत असलेले अनुभवी कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही असे पद भटनेत आले होते मात्र आता आपले सरकार सेवा केंद्र वाऱ्यावर असतानाचे दिसून येत आहे.
19/2/2019 रोजी महाराष्ट्र राज्य शासन निर्णय क्रमांक 24 प्र.क्र.66/मातंग नुसार महाराष्ट्रातील सर्व BM, DM, DHE पद नसल्यामुळे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या कोणाकडून सोडवायच्या तसेच तांत्रिक बाबी कोणाकडे मांडाव्यात असा प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ग्रामीण स्तरावरील जनतेला अडचणी समोरे जावी लागत आहे. त्यामुळे गाव पातळीवर शासकीय योजनेचा लाभ जसे की, लेक लाडकी, कृषी विमा व इतर विविध योजना देण्यात येणाऱ्या सेवा यामध्ये खंड पडलेले असून शासकीय योजना पासून वंचित राहत आहे. वरील शासन निर्णयानुसार BM, DM आणि DHE यांचे पदाबाबत काही स्पष्टता नसल्यामुळे त्यांना कोणीही मानधन द्यायला तयार नाही आणि मागील तीन महिन्यापासून मानधन मिळालेले नाही त्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.
2011 पासून कार्यरत असलेली सर्व BM, DM, DHE ची मागील 12 ते 13 वर्षापासून शासन स्तरावर सेवा देत असून या शासन निर्णयामुळे सर्व अनुभवी असलेले संगणक तज्ञांची वय आता 30 ते 40 पार केलेले तरुण बेरोजगार झालेले असून शासन स्तरावरून आमचा विचार करण्यात येईल अशा अशा शासन दरबारी मागणी सुरू आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #aplesarkarseva )