धानोरा तालुक्यात केवळ तीन केंद्रावर धान खरेदी

262

– इतर सात केंद्रावर धान खरेदी सुरू करण्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१२ : महाराष्ट्रात राज्यात गडचिरोली जिल्हा धान उत्पादक म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. धानोरा तालुक्यात ऐकून दहा (१०) धान खरेदी केंद्रांना मंजुरी करिता प्रस्ताव पाठवण्यात आले खरे परंतु खरेदी केंद्र सुरू होण्यास अजूनही विलंब होत असल्याचे दिसून येत असून केवळ तीन केंद्रावर धान खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन क्रॅब लागत असून उर्वरित सात (७) धान्य केंद्र सुरू कण्याची मागणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे धान्य खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु धानोरा तालुक्यातील मंजुरी प्रदान झालेल्या पैकी केवळ तिनच ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झालेली असून उरलेले ७ खरेदी केंद्रावरती शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची परेशानी वाढली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली गरज भागविण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांना धान विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्याची लुटमार होताना दिसते. त्यामुळे तालुक्यातील इतरही धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. धानोरा तालुक्यातील सहा हजार पाचशे एकवीस शेतकऱ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्री केल्याची कळते. शेतकऱ्यांना धान खरेदीस सुलभ होण्यासाठी सातबारा ऑनलाइन प्रक्रिया चालवण्यात आली त्यात धानोरा तालुक्यातील धान १० खरेदी केंद्र अंतर्गत एकूण 6521 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यात धानोरा केंद्र 621, रांगी 739, दुधमाळा 477, कारवाफा 594, मोहली 837, 567, चातगाव 583, मुरूमगाव 873, पेंढरी खरेदी केंद्रावर 558 असे एकूण 6521 शेतकऱ्यांनी धान विक्री करिता ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत धानोरा तालुक्यात दहा खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान केली आहे परंतु सध्या स्थितीत सुरसुंडी, धानोरा आणि रांगी या तिन केंद्रावरती प्रत्यक्ष धान खरेदी प्रक्रिया सुरू झालेली आहे. धानावरती लष्करी अळी ने आक्रमण केले असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे दाण्याला चांगलाच फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळात वेळ काढून आपल्या धानाची मळणी केली. येवढे मोठे धान घरीच साठवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे होत असल्याने धानोरा तालुक्यातील इतर धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे ज्यामुळे तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना अतिशय कवडीमोल किमतीला धान्य विकण्याची पाळी येऊ नये व शेतकऱ्यांना हमीभावचा लाभ घेता होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here