कुरखेडा येथे नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा व भव्य शोभायात्रा

249

– सामाजिक उपक्रमा अंतर्गत दुर्बल घटकासाठी ३३ शिलाई मशिनचे वाटप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०६ : शहरात अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिन पिठ नाणीज धाम यांच्या पादुका दर्शन, प्रवचन व सामाजिक उपक्रम कार्यक्रम क्रिडा संकुल पटाचे मैदान यांच्या प्रांगणात शुक्रवार ६ डिसेंबर रोजी पार पडला.
सुरुवातीला सकाळी ९.३० वाजता भव्य शोभायात्रा दिनू वगारे यांचे घरापासून ते हनुमान मंदिर, गांधी चौक, पोलीस स्टेशन रोड मार्गाने सरळ कार्यक्रम स्थळी आणण्यात आली. शोभायात्रेत संप्रदायाचा बॅनर, बॅंड ढोल ताशाच्या गजर, कलश धारी, ध्वज धारी पुरुष, महिला, झाँकी – संजीवनी व धर्मक्षेत्र, ब्लड इन नीड, कलश धारी महिला, भगवान बिरसा मुंडा झॉकी,आदिवासी नृत्य, रथावर सिद्ध पादुका व स्वामीची प्रतिमा, घोड्यावर स्वार शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, वारकरी भजन, दिंडी, लेझीम पथक, शोभा यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर सिद्ध पादुकाचे गुरुपूजन, सामाजिक उपक्रमात दुर्बल घटकासाठी ३३ शिलाई मशीनचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जनम संस्थाचे प्रवचनकार संदिप थोटे लातुर यांनी आपल्याअमृततुल्य वाणीतून सुंदर प्रवचन करून गुरु भक्तांना रिझवले व उपासक दिक्षा, पुष्पवृष्टीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
पुजेचे यजमान – दिनू वगारे पत्नी दुर्गा दिनू वगारे, प्रेमचंद मच्छीरके पत्नी रेखा प्रेमचंद मच्छीरके, प्रदिप बनसोड पत्नी उर्मिला प्रदिप बनसोड  व कार्यक्रम मुख्य पुजेचे यजमान – चामोर्शी तालुक्यांतील मालेर चक संतोष खोबे पत्नी वंदना खोबे, नगरपंचायत कुरखेडाच्या नगराध्यक्षा अनिता राजेंद्र बोरकर पती राजेंद्र बोरकर, द्रोणाचार्य खोटेले पत्नी संध्याताई द्रोणाचार्य खोटेले यांच्या हस्ते सिद्ध पादुकाचे पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमात आमदार रामदास मसराम, नगराध्यक्ष अनिता बोरकर, विश्वहिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, माजी जि.प. उपाध्यक्ष जिवन नाट, माजी जि.प. सदस्य अशोक इंदुरकर, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड उमेश वालदे, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख आशिष काळे, नगरसेवक जयेंद्रसिह चंदेल, भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, जनमसस्थान नाणिजचे सोमदेव अप्पा, पिठ प्रमुख नागपूर राजेंद्र भोयरे, पिठ व्यवस्थापक नागपूरचे प्रविन परब, पीठ सहप्रमुख सुरेश लाखे, पीठमहिला निरीक्षक वैशाली चतुर, आसिफाबादचे निरीक्षक दिलीप गायकवाड, निरीक्षक मेघराज निबुद्धे, लेप्टनंनकल अजय शिंदे, न.प. चामोर्शीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, उप पिठकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सल्लागार राम सातपुते, निरीक्षक विजय गडपायले, जिल्हाध्यक्ष प्रकाश कुनघाडकर, सचिव अतुल धात्रक, महिला अध्यक्ष कविता चिळांगे, जिल्हाकर्नल लोमेश भांडेकर, युवा निरीक्षक किशोर चिमूरकर, शंकर कोंडावार, गोपिनाथ सुकारे, प्रतिभा बोरकर, प्रदिप बनसोड, प्रेमिला चौधरी, पांडूरंग चंदनखेडे, पुंडलीक बोरकर, दयाराम दरो,रतिराम कुभरे, राजकला गावड, दर्शना शेडमाके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गुरुबंधू – गुरु भगणी उपस्थित होते. तर सर्वाना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. स्वस्वरूप सांप्रदायाचे तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. कुरखेडा येथील पोलिसांनी कार्यक्रमाकरिता चोख पोलीस बदाबेस्त ठेवण्यात आला होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here