०३ ऑगस्ट ला ‘सर्च’ रुग्णालयात ‘वेदना व्यवस्थापन ओपीडी’

109

The गडविश्व
गडचिरोली, दि २७ : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नियमित वेदना व्यवस्थापन ओपीडी सुरु झाली आहे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही ओपीडी असते. शनिवार ०३ ऑगस्ट २०२४ रोजी सर्च रुग्णालयात वेदना व्यवस्थापन ओपीडी घेण्यात येणार असून, डॉ. जितेंद्र जैन व सहकारी डॉक्टरांची टीम हे तपासणी करणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पाहता व मागील महिन्यात झालेल्या ओपिडीला रुग्णांचा प्रतिसाद बघता सर्च येथील माँ दंन्तेश्वरी रुग्णालयात शनिवार ०३ ऑगस्ट २०२४ रोज ला ही वेदना व्यवस्थापन ओपिडी आयोजित केली असून ही ओपीडी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राहिल. वेदना व्यवस्थापन ओपीडी चे मार्गदर्शन मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन हे करतील. या ओपीडी मध्ये पाठीचा कणा दुखणे ,पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे,मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल. तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे,टाचेचे दुखणे, डोकेदुखी यामुळे होणार्‍या वेदना, कर्करोग आजारांमुळे होणार्‍या तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना या सर्वांवर उपचार होईल.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. तसेच ज्या रुग्णांना तपासणी नंतर वेदना निवारण इंजेक्शनची (पेन ब्लॉक) आवश्यकता असेल त्यांना १००% मोफत प्रोसीजर सेवा देण्यात येईल. तरी या वेदना व्यवस्थापन ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here